About Us
पोलीस बिनतारी संदेश विभाग ही पोलिसांची तांत्रिक शाखा आहे.
वायरलेस विभागाकडून अखंडीतपणे २४ तास बिनतारी दळणवळण पोलिसांना कायदा व सुव्यस्था राखणेकरीता पुरविले जाते. पोलीस दलाच्या अन्य तांत्रिक गरजांकरीता पोलीस बिनतारी संदेश विभागाची मदत घेतली जाते, तसेच तांत्रिक सेवा पुरविणाऱ्या अन्य विभागांशी संस्थांशी बिनतारी संदेश विभागामार्फत समन्वय ठेऊन पोलीस दलाकरिता अखंडित व सुरळीत तांत्रिक सेवा उपलब्धतेसाठी समन्व्यय ठेवला जातो. विविध प्रकारचे व्हॉईस संवाद, डेटा संदेशन, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ही या शाखेची प्रमुख जबाबदारी आहे. तसेच या शाखेत तोडफोड़विरोधी उपकरणे, सीसीटीव्ही, कंट्रोल रूम हे देखरेख ठेवतात. प्रत्येक पोलिस स्टेशन, पोलिस मोबाइल, चेकपोस्टमध्ये वायरलेस सेट असतात. बीट मार्शल हे वॉकी टॉल्कीने सुसज्ज आहेत. वायरलेस कम्युनिकेशन कव्हरेज क्षेत्रामध्ये वाढ करण्यासाठी डोंगराच्या वरच्या किंवा उंच इमारतीमध्ये असलेल्या रिपीटर वापरल्या जातात.
छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलात आरसीपीची चार टीम आहे. प्रत्येक पथकात २५ पोलीस शिपाई असतात. अचानक दंगल परिस्थितीचा सामना करण्यासाठी दंगा नियंत्रण पोलीस (आर.सी.पी.) ची स्थापना करण्यात आली आहे. प्रशिक्षित पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी हे पथक बनलेले असते. प्रतिकूल परिस्थितीत काम करण्यास सक्षम असणारे पोलीस कर्मचारी आणि प्रशिक्षित अधिकारी समाजात कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत करतात.