Police Welfare Branch

About Us

मानवी संसाधन विभाग छत्रपती संभाजीनगर ग्रामीण.

 

 पोलीस अधीक्षक कार्यालय येथील मानव संसाधन विभाग (पोलीस कल्याण शाखा) ही एक महत्वाची शाखा असुन येथे पोलीस अधिकारी व पोलीस अमंलदार यांच्यासाठी वेगवेगळे आरोग्य शिबिरे, प्रशिक्षण कार्यक्रम, जागरुकता कार्यक्रम, विविध कल्याणकारी उपक्रम राबविण्याते येते. तसेच याव्दारे सर्व पोलीसा करीता वैद्यकीय उपचार हे विनाखर्च होण्यासाठी " महाराष्ट्र पोलीस कुटुंब कल्याण योजना " मार्फत तात्काळ हॉस्पिटल सुविधा या शाखे‌द्वारे पुरवण्यात येते.

 

मानवी संसाधन विभागाचे प्रमुख कार्य 

 

1.   मानवी संसाधन विभागा  मार्फत स्कॉलरशिप, शैक्षणीक कर्ज,किंवा अग्रीम , पुस्तक अऩुदान, पोलीस अमलदारांकरिता रजा प्रवास, एकलव्य योजना,वैद्यकीय अग्रीम, अत्यंविधी अऩुदान ,सानुग्रह अऩुदान, महिला भत्ता, विशेष पोषण आहार भत्ता, इ. योजना राबविण्यात येतात.

2. मानव संसाधन विभाग मार्फत नियमित पणे पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्याकरिता वैद्यकीय चाचणी शिबिरांचे आयोजन करण्यात येते. 

3. पोलीस अधीक्षक छ.संभाजीनगर ग्रा. आस्थापनेवरील सर्व अधीकारी व अंमलदार यांनी मेडीकल बाबत नाहरकत प्रमाणपत्र देण्यात येते.

4.  स्टुन्डट पोलीस कॅन्डेट प्रोग्राम हा ग्रामीण हद्दीतील 27 जि.प.शाळेमध्ये राबविण्यात येतो.

5.  पोलीस कल्याण अंतर्गत येणा-या व्यावसायीक अस्थापना कैलाश शिल्प, दक्षता पेट्रोल पंप (02) रक्षक गॅस एजन्सी, खाकी उपहार गृह इत्यादी पोलीस कल्याण निधीचे उत्पन्नाची साधने आहेत. 

6. आर्थीक वर्षा  मधील सर्व थोर पुरुष ,यांची जंयती, पुण्यतिथी, शपथ घेण्याचा कार्यक्रम रावबिण्यात येते.