सप्तरंग रिल्स स्पर्धा -2025

Saptaranga Reels Competition - 2025

विषय : 1. अंमली पदार्थ व इतर व्यसनांचे दुष्परिणाम

2. महिला सशक्तिकरण

छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्हा पोलीस आयोजित जनजागृती अभियाना अंतर्गत जिल्‍हास्‍तरीय “ सप्तरंग रिल्स स्‍पर्धा - 2025 ” स्पर्धेची नियमावली :

  • रिल्सचा विषय हा नमुद दोन विषयांशी संबंधीत असावा.
  • सप्तरंग रिल्स स्पर्धेची प्रवेश फी ही ५००/- रुपये असेल.
  • सप्तरंग रिल्स स्पर्धा ही फक्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यापुरती मर्यादीत आहे.
  • रिल्स मराठी, हिंदी किंवा इंग्रजी यापैकी कुठल्याही एका भाषेत असणे आवश्यक आहे.
  • रिल्स मध्ये अश्लीलता किंवा बिभत्स्य कृत्य, अथवा कृरता, किळसवाणे प्रसंग या मध्ये टाकता येणार नाही याची दक्षता कटाक्षाने घ्यावी. तसेच रिल्स मध्ये दाखविलेले प्रसंग हे सेंन्सॉरच्या अधिनियमा नुसार असणे आवश्यक आहे.
  • रिल्स सादरीकरणाची एकुण वेळ ही ३० ते ९० सेकंदा पर्यंतच असणे आवश्यक आहे.
  • प्रवेशिका जमा करण्याची अंतिम तारीख १५/०९/२०२५ रोजी पर्यंत असेल. आपल्या रिल्सची प्रवेशिका https://csn.mahapolice.gov.in/short-film-form ह्या लिंक वर फॉर्म भरून पाठवावे. आपली रिल्‍स Saptarangcsnrsp@gmail.com वर पाठवणे.
  • रिल्स मध्ये वापरलेली सामग्री ही स्वतः च्या मालकीची किंवा परवाणाधारक असणे आवश्यक आहे.
  • रिल्स मध्ये कोणतेही कॉपीराईट केलेले लोकेशन, प्रसंग, संगीत साहित्य वापरलेले नसावे. तसेच रिल्स ही कॉपीराईट केलेली नसावी.
  • रिल्स ही स्पर्धे साठी नविन असणे आवश्यक आहे. तसेच रिल्स ही सोशल मिडीयावर टाकलेली नसावी.
  • रिल्स ची प्राथमिक फेरी ही दिनांक १६/०९/२०२५ रोजी ११.०० वाजता गोकुळ मैदान मिटिंग हॉल या ठिकाणी स्क्रीनिंग केली जाईल. व त्यातील निवडक रिल्स ह्या अंतिम फेरी साठी निवडल्या जातिल. त्यांना अंतिम स्पर्धेच्या दिवशी आमंत्रित करण्‍यात येईल व त्‍याच दिवशी बक्षिस वितरणाचा कार्यक्रम होईल.
  • सर्व रिल्स स्पर्धकांसाठी प्रवेश फी ही ५००/- असणार आहे. ते SBI चे खाते क्रमांक 62062693751 IFSC Code - SBIN0020786 यावर पाठवावे.तसेच प्रवेश फी पाठविल्याचे स्क्रिनशॉट आयोजकांना पाठवावे.
  • स्पर्धकांनी रिल्सची संपुर्ण माहिती ही आयोजकांना लेखी देणे बंधनकारक असेल.
  • परिक्षकांनी निवडलेल्या रिल्सचा निकाल हा अंतिम व बंधनकारक राहिल.
  • सप्तरंग रिल्स स्पर्धेतील विषय निहाय पारितोषिक पुढील प्रमाणे असेल. • प्रथम दोन सर्वोत्‍कृष्ट रिल्स पारितोषिक (२१०००/-), व्दितीय दोन सर्वोत्‍कृष्ट रिल्स पारितोषिक (११०००/-), तृतिय दोन सर्वोत्‍कृष्ट रिल्स पारितोषिक (७०००/-), या प्रमाणे सर्व विषयासाठी लागु असतील. • तसेच सर्वोत्‍कृष्ट दिग्दर्शक (गिफ्ट, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र), • सर्वोत्‍कृष्ट अभिनेता (गिफ्ट, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र), सर्वोत्‍कृष्ट अभिनेत्री (गिफ्ट, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र), • तसेच सर्व अंतिम निवडलेल्या विषयनिहाय रिल्स टीमला प्रत्येकी एक प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देण्यात येईल.
  • अंतिम स्पर्धेत सादरीकरण (स्क्रीनिंग) साठी निवडलेल्या रिल्सचे संपुर्ण हक्क हे छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीसांचे राहतील. व स्पर्धा संपेपर्यंत कोणत्याही स्पर्धकाला माघार घेता येणार नाही.
  • सप्तरंग रिल्स स्पर्धेमध्ये रिल्सचे प्रसारण हे समाज हिताच्‍या दृष्टीने सोशलमिडीयावर प्रक्षेपणाचा संपुर्ण हक्क सर्वप्रथम छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्हा पोलीस दलाचा असेल. तसेच स्पर्धा संपल्या नंतर समन्वय समितीच्या आदेशाने आपल्या रिल्स सोशलमिडीयावर प्रसारीत करण्याचा हक्क आपल्याला दिला जाईल. या साठी आमची परवाणगी घेणे आवश्यक व बंधनकारक असेल.
  • अंतिम निवडलेल्या संघांना चहा/पाण्याची व्यवस्था ही बक्षिस वितरणाच्या दिवशी आयोजकांकडुन करण्यात येईल. येणे जाणे व राहण्याची व्यवस्था ही आयोजकांकडुन करण्यात येणार नाही.
    छत्रपती संभजीनगर जिल्ह्यातील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे की, जास्तीत जास्त स्पर्धकांनी यात भाग घेवुन सप्तरंग रिल्स स्पर्धेत आपले मोलाचे योगदान द्यावे.